Abstract:
प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय शिवाजीनगर, पुणे -०५ येथील मराठी विभागाने मा. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन दिनांक १५ ऑक्टोबर २०२० रोजी आयोजित केला.या वाचन प्रेरणा दिनाच्या कार्यक्रमाचे विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आकर्षण ठरले ते म्हणजे मराठी विभागाने ऑनलाईन आयोजित केलेल्या मराठी साहित्याचे वाचन. कविता वाचन, कथा वाचन, निबंध वाचन, नाट्य वाचन असा सुमारे दोन तासांचा ऑनलाईन सादरीकरणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. वाचन संस्कृती या विषयावर कवी प्रा. डॉ. अरविंद हंगरगेकर यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान
विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन आयोजित केले. याप्रसंगी पन्नासहून अधिक विद्यार्थी ऑनलाईन उपस्थित होते. या कार्यक्रमात महाविद्यालयातील इतर प्राध्यापक सहकाऱ्यानी सहभाग नोंदवला.हिंदी विभागप्रमुख डॉ.प्रेरणा उबाळे यांनी बालपणीच्या आठवणी संदर्भात एक कविता सादर केली.अनिमेशन विभागाचे समीर नेर्लेकर,वाणिज्य विभागाचे रुपेश बनसोडे यांनी सहभाग घेतला.